दोघांनीही नाव नसलेल्या वॉर्डातून लढू; हिंमत असेल तर या आमनेसामने : अशोकराव जाधव


दैनिक स्थैर्य | दि. 19 ऑक्टोबर 2021 | फलटण | ज्या वॉर्डात दोघांचेही नाव नाही अशा वार्ड मधून आपण दोघांनीही निवडणूक लढवू जर तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर दोघांचेही नाव नसलेल्या असलेल्या वॉर्डमध्ये आमने-सामने येऊन निवडणूक लढवून दाखवा. ज्या वॉर्ड मध्ये नाव नाही, त्या वॉर्ड मधून निवडणूक लढवून जिंकून यायला दम लागतो. जर हिंमत असेल तर वॉर्ड सोडून दुसऱ्या वॉर्डमधून निवडणूक लढवून आमने-सामने या, असा प्रत्यारोप नगरसेवक अशोकराव जाधव यांनी नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांच्यावर केलेला आहे.

मी कधीही कोणाला ब्लॅकमेल केलेले नाही. व्यवसायिकांना कोणत्याही प्रकारचा कसलाही त्रास दिलेला नाही. ब्लॅकमेल करून फलटण शहरामध्ये कोण कोणाला त्रास देतो, हे फलटण शहरातील जनतेला चांगलेच माहित आहे. कोणत्याही व्यसनामुळे मी कधीही अडचणीत आलेलो नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वेळा येत असतात, वेळ आली होती. ती गेली. परंतु तुम्ही एका गुन्ह्याच्या जामिनावर बाहेर आहात हेही लक्षात ठेवा. तुम्हाला कोणीही दारामध्ये उभे करत नाही. चिकन सेंटरचे उद्घाटन करण्याला सुद्धा निमंत्रित करावे लागते, असेही नगरसेवक अशोकराव जाधव यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!