राज्यासह देशावरील कोरोनाचे संकट लवकर जावूदे : आमदार दीपक चव्हाण; कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा फलटण येथे शुभारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. १६ : केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार तीन टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात क्षेत्रीय आघाडीवर काम करणारे स्वच्छता कर्मचारी व कामगार, पोलीस आदी. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील सर्व नागरिक तसेच ५० वर्षाखालील सहव्याधी (मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी) असणारे नागरिक यांना लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या आपल्या राज्यासह देशावर असणारे कोरोनाचे म्हणजेच कोव्हीड १९ या आजाराचे संकट लवकर जावूदे असे प्रतिपादन आमदार दीपक चव्हाण यांनी केले.

कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करताना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपकराव चव्हाण बोलत होते. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपकराव चव्हाण व जिल्हा परिषद सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आज शनिवार १६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय येथे झाला.

कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ फलटण येथे करताना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपकराव चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. व्यंकट धवन, नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एम. जगदाळे, फलटण तालुका भाजपचे अध्यक्ष अमोल सस्ते, युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून कोविड १९ आजारावरील ‘कोविशील्ड’ या लसीबाबत संपूर्ण माहिती घेतली व लास घेतल्यानंतर सुद्धा सर्वानीच काळजी घेणे आवश्यक आहे या बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

तत्पुर्वी, देशव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सकाळी १०.३० वाजता विलेपार्ले स्थित डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात दृकश्राव्य माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय व नंतर प्राथमिक आरोग्य केंद्र येथील ठराविक बूथवर आगामी काळात लसीकरण होणार आहे. सुरुवातीला दररोज सरासरी १०० जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. व्यंकट धवन यांनी या वेळी दिली.

फलटण तालुक्याला पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून कोविड १९ आजारावरील ‘कोविशील्ड’ या लसीचे सुमारे २००० डोस उपलब्ध झाले आहेत. फलटण तालुक्यातील ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसींसाठी नोंदणी केलेली आहे त्यांनाच सुरवातीच्या काळात लस उपलब्ध होणार आहे. या मोहिमेसाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!