स्थैर्य, वाई, दि. 23 : वाई अर्बन बँकेचे आजी-माजी पदाधिकारी यांच्या योगदानामुळेच बँकेने 100 वर्षांची दैदिप्यमान परंपरा निर्माण केली आहे. सध्या कोरोना महामारी व शासनाचे टाळेबंदी धोरणामुळे आर्थिक क्षेत्रांला मोठा फटका बसला आहे. वाई अर्बन बँकही त्यास अपवाद नाही. आगामी काळात आपली बँक पश्चिम महाराष्ट्रात आर्थिक क्षेत्रांत आघाडीवर ठेवण्यासाठी बँकेचे सर्व माजी पदाधिकारी व सभासद, ठेवीदार, कर्जदार यांनी सहकार्य करावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे यांनी केले.
बँकेच्या शताब्दी महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी, शासनाच्या विविध उपाययोजनांचे पालन करून आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमात सीए. चंद्रकांत काळे बोलत होते. याप्रसंगी बँकेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व संचालक सोशल डिस्टन्सचे पालन करून उपस्थित होते. सीए. चंद्रकांत काळे म्हणाले, बँकेचा शताब्दी महोत्सव हा खरं तर वाईकरांचा आनंदोत्सव आहे. परंतु कोरोना महामारीमुळे आपल्याला कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम घेता येत नाहीत. या महोत्सवात वर्षभर कार्यक्रम राबविण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून रक्तदान शिबीर या सामाजिक उपक्रमाने महोत्सवाचा प्रारंभ करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. कोरोना महामारीमुळे मार्च 2020 पासून बँकेला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचा फटका चालू आर्थिक वर्ष व मागील वर्षाच्या बँकेच्या कामगिरीवर होणार आहे. यातूनही बँकेला सावरण्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही सीए. चंद्रकांत काळे यांनी केले.
याप्रसंगी बँकेचे माजी अध्यक्ष सीतारामपंत जोशी, सतीशराव शेंडे, पोपटलाल ओसवाल, डा. मधुसुदून मुजुमदार, माजी उपाध्यक्ष प्र. ल. सोनपाटकी, निवृत्त व्यवस्थापक रा. ना. कानडे, अविनाश जोशी, नरेंद्र गांधी, मधू नेने, सीए. प्रविणा ओसवाल आदींनी मनोगत व्यक्त करून बँकेला शुभेच्छा दिल्या. यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष भगवानदास शहा, अरूण देव, कांतीलाल जैन, ॲड. सूर्यकांत खामकर, माजी उपाध्यक्ष सुनील शिंदे, विवेक पटवर्धन, माजी संचालक अनंतराव शेवडे, डा. शरद अभ्यंकर, अरूण मुळे, दत्तात्रय जठार, कन्हैय्यालाल गांधी, डा. सुधीर बोधे, श्रीमती सुनंदा मुळ्ये, कविता अभ्यंकर, योगिनी गोखले, वैशाली दिवेकर, जान्हवी पोरे, अनुराधा जोशी, शाखा समिती सदस्य प्रवीण जगताप, अरूण पवार, रमेश ओसवाल, अरूण आदलिंगे, प्रशांत नागपूरकर, अमोल शेवते आदी उपस्थित होते. प्रारंभी बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे, उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, ज्येष्ठ संचालक विनय जोगळेकर, संचालक मदनलाल ओसवाल, ॲड. प्रतापराव शिंदे, विवेक भोसले, सीए. ॲड. राजगोपाल द्रवीड, विद्याधर तावरे, मनोज खटावकर, प्रा. विष्णू खरे, भालचंद्र देशपांडे, डा. शेखर कांबळे, स्वरूप मुळे, अनिल देव, संचालिका अंजली शिवदे, सीईओ श्रीपाद कुलकर्णी, उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर काळे, संतोष बागुल, सिध्दार्थ कांबळे तसेच सुवर्णा काळे, भारती चावलानी, डा. शीला जोगळेकर, मीरा देव, सुवर्णा ओसवाल, धनश्री भोसले, हेमा द्रवीड, विशाखा तावरे, कविता खटावकर, हेमा देव, दया मुळे, शुभदा नागपूरकर, दिलीप शिवदे, अरविंद कोठावळे, प्रा. किशोर अभ्यंकर, ईश्वरभाई जोशी, प्रा. सदाशिव फडणीस, कुबेर, प्रमोद शहा, सचिन गांधी, देवानंद शेलार, पुरूषोत्तम दिवेकर, मकरंद मुळे, सुरेश वखारकर, विजयकुमार मुळीक, मिलिंद पुरोहित यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाबळेश्वरकर गुरूजी यांच्या पौरोहित्याखाली श्री. सत्यनारायण पूजा, श्रीलक्ष्मी पूजन, दीपप्रज्वलन, श्रीफळ वाढवून शताब्दी वर्षाचा शुभारंभ करण्यात आला.