राज्यातील व्यायामशाळा आणि केशकर्तनालये येत्या आठवड्यात सुरू होणार – अस्लम शेख


स्थैर्य, मुंबई, दि. 25 : मुंबईसह राज्यातील व्यायामशाळा व केशकर्तनालये (सलून) येत्या आठवड्याभरात सुरु होणार असून येत्या दोन दिवसांमध्ये याबाबतची नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली जाणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री श्री.अस्लम शेख यांनी दिली आहे.

राज्य मंत्रीमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीनंतर श्री. अस्लम शेख यांनी ही माहिती दिली. श्री. शेख यांनी सांगितले की, आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील व्यायायमशाळा व केशकर्तनालये सुरू करण्याबाबत चर्चा झाली. सलून व व्यायामशाळा सुरू करण्यासंदर्भातील नियमावली व मार्गदर्शक तत्त्वे राज्य शासन आखून देणार आहे. ही नियमावली सर्व व्यायामशाळा व केशकर्तनालये/सलून मालकांसाठी बंधनकारक असेल. जिमला जाणाऱ्यांनी तसेच केस कापण्यासाठी जाणाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे व मास्क वापरणे, सॅनिटायझेशन बंधनकारक आहे. सर्व नियमांचे कडक पालन करूनच प्राथमिकस्तरावर व्यायामशाळा व केशकर्तनालये उघडण्यास परवानगी दिली जाईल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!