बिबट्याचा शेळीवर हल्ला


दैनिक स्थैर्य । दि.०६ जानेवारी २०२२ । पाटण । पाटण तालुक्यातील त्रिपुडी येथे मध्यरात्री लक्ष्मण धोंडीबा देसाई यांच्या घरातील गोठ्यात शेळीवर रात्री १२ वाजता बिबट्याने हल्ला केल्याने शेळी जागीच ठार झाली आहे. शेळीचा धडपडण्याचा आवाज येताच आरडाओरडा केल्याने बिबट्या पसार झाला. मात्र, तोपर्यंत शेळी जागीच ठार झाली होती. दरम्यान, मागच्या आठवड्यापासुन सर्वच विभागामध्ये बिबट्याचा वावरही नित्याचीच बाब झाली आहे. पाळीव जनावरांसह नागरिकांवरही बिबट्याचे हल्ले होऊ लागल्याने नागरिकांत भितीचे वातावरण आहे. वन विभागाने त्रिपुडी येथे येवून मृत शेळीचा पंचनामा करुन शेतकरी लक्ष्मण धोंडीबा देसाई यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.


Back to top button
Don`t copy text!