आ. गोरे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे नातीं बरोबर; श्रीमंत रामराजेंचे WhatsApp स्टेटस


दैनिक स्थैर्य । दि. ०४ सप्टेंबर २०२२ । फलटण । बगलबच्यांच्या नावावर हजारो एकर जमिनी खरेदी करून त्यातून मलिदा छापायचा म्हणूनच म्हसवड एमआयडीसी स्थलांतरित झाल्याची राजकीय आवई उठवली जात आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हसवड एमआयडीसीच्या स्थलांतरणाचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे रामराजे यांनी आता वयाचा विचार करून विश्रांती घ्यावी असा टोला लगावला होता. त्यावर आज आपल्या नातींचा फोटो स्टेटसला पोस्ट करून “आ. गोरे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे नातीं बरोबर” असा मिश्किल टोला ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

सध्या सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव येथे होत असलेल्या एमआयडीसीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यानिमित्ताने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व जयकुमार गोरे हे पुन्हा एकदा आमने सामने येवून एकमेकांवर टोले व प्रतिटोला लगावत आहेत. अश्यामध्येच आज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या नातींचा फोटो व्हाट्सअँप स्टेस्टेसला ठेवत “आ. गोरे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे नातीं बरोबर” असा टोला लगावला आहे. श्रीमंत रामराजेंनी पोस्ट केलेले हे स्टेटस त्यांचे कार्यकर्ते चांगलेच व्हायरल करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!