‘लोकसंस्कृतीत लोकसाहित्याचे महत्त्व’ या विषयावर रविंद्र बेडकिहाळ यांचे व्याख्यान


दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२१ । फलटण । संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मी कास्ट फ्री मूव्हमेंट’ व राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेया ‘महाराष्ट्राची कलासंस्कृती’ या विशेष व्याख्यानमालेत ‘लोकसंस्कृतीत लोकसाहित्याचे महत्त्व’ या विषयावर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य तथा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांचे व्याख्यान संपन्न होणार आहे.

बुधवार, दि.21 जुलै 2021 रोजी रात्री 7:50 ते 9:00 या वेळेत गुगल मीट अ‍ॅपद्वारे https://meet.google.com/rqo-ruxb-ykr या लिंकवर जावून श्रोत्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘मी कास्ट फ्री मुव्हमेंट’ चे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.प्रशांत गेडाम यांनी केले आहे.

डॉ.प्रशांत गेडाम यांनी खा.सौ.सुप्रिया सुळे वाढदिवस (30 जून) ते ना.अजितदादा पवार वाढदिवस (22 जुलै) अशी 23 दिवसांची ऑनलाईन पद्धतीने विशेष व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. या व्याख्यानमालेत आतापर्यंत 20 विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत.


Back to top button
Don`t copy text!