स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांना मरण्यासाठी सोडणे हाच तिरंग्याचा अमान, शिवसेनेचा मोदींवर निशाणा

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 3, 2021
in महाराष्ट्र
ADVERTISEMENT

स्थैर्य, मुंबई, दि.३: नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. अद्यापही हे आंदोलन सुरू आहे. दिवसेंदिवस दिल्लीतील तणाव वाढताना दिसत आहे. दरम्यान प्रजासत्ताक दिनी झालेल्या तथाकथित हिंसेनंतर शेतकरी आंदोलन आणखी तीव्र झाले आहे. तसेच प्रजासत्ताक दिनी आंदोलकांनी म्हणजेच शेतकऱ्यांनी तिरंग्याचा अपमान केल्यावरूनही आरोप केले जात आहे. पंतप्रधान मोदी यांनीही याबाबत दुःख व्यक्त केले होते. त्यावरून शिवसेनेनं पंतप्रधानांवर निशाणा साधत काही सवाल उपस्थित केले आहेत.

‘श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा काढली होती. त्याचे सारथ्य करणारे नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत. अतिरेक्यांच्या गोळ्यांची, बॉम्बची पर्वा न करता श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकविणारे नरेंद्र मोदीच होते. तिरंग्याविषयीच्या त्यांच्या भावना ज्वलंत आहेत. त्यामुळे मोदी यांच्या भावना या महत्त्वाच्या आहेत. मूळ मुद्दा इतकाच की, लाल किल्ल्यावर तिरंग्याचा तथाकथित अपमान करणाऱ्यांचे धागेदोरे नक्की कोठपर्यंत पोहोचले आहेत ते समोर आणा. दुसरे असे की, न घडलेल्या अपमानावर काहूर माजवणे हासुद्धा तिरंग्याचा अपमान आहे. पण बोलायचे कोणी?’ असे म्हणत शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल केले आहेत.

सामना अग्रलेखात नेमके काय?

  • लाल किल्ल्यावर शेतकऱ्यांच्या एका गटाने गोंधळ घातला. त्यात जो तिरंग्याचा अपमान झाला त्यामुळे आपले प्रिय पंतप्रधान मोदी अत्यंत दुःखी झाले आहेत. ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी त्यांचे मन मोकळे केले. ‘26 जानेवारी रोजी तिरंग्याचा अपमान झाला. त्यामुळे देश दुःखी झाला’, अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधानांचे असे म्हणणे असेल तर ते योग्यच आहे. देशातल्या सव्वाशे कोटी नागरिकांच्या भावना याच आहेत. तिरंग्याचा सन्मान हाच राष्ट्राचा सन्मान असतो.
  • सीमेवर तैनात सुरक्षा दलाचे बजेट या वर्षी 7.1 टक्क्यांनी वाढवले आहे. सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, हिंदुस्थान-तिबेट सीमा पोलीस दलासाठी नव्या अर्थसंकल्पात 1 लाख तीन हजार 803.52 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली, ती फक्त तिरंग्याचा सन्मान करण्यासाठीच. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, पंतप्रधानपदावर कोणीही विराजमान असो, तिरंग्याचे रक्षण करणे हे त्याचे प्रथम कर्तव्य ठरते. म्हणूनच मोदी यांच्या भावना त्यादृष्टीने महत्त्वाच्या आहेत. पण 26 जानेवारीस म्हणजे प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर घडलेल्या प्रसंगाचा जो राजकीय धुरळा उडवला जात आहे तो कितपत योग्य आहे?
  • साठ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा एक गट त्या दिवशी लाल किल्ल्यावर घुसला. त्यांनी हडकंप माजवला. त्यात तिरंग्याचा अपमान झाल्याचा प्रचार भाजप सायबर फौजांनी केला. तो अपप्रचारच ठरला. जे चित्रीकरण समोर आले त्यात तिरंग्याचा अपमान वगैरे झाल्याचे कुठेच दिसत नाही. तिरंगा लाल किल्ल्यावर डौलाने फडकतच होता, पण शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचले हे उघड झाले. तिरंगा आम्हाला ‘जान से प्यारा’ आहे. भाजपच्या सायबर टोळधाडीस तिरंगा जितका प्यारा आहे त्यापेक्षा जास्त तो गाझीपूरच्या आंदोलक शेतकऱ्यांना प्यारा आहे.
  • तिरंगा अपमानित करून कोणतेही आंदोलन चालणार नाही. प्रश्न इतकाच आहे, जो अपमान झालाय असे दिसत नाही त्यावर पंतप्रधानांनी इतके व्यथित का व्हावे किंवा सत्ताधारी पक्षाने इतकी आदळआपट का करावी? पंतप्रधान मोदी यांच्या भावना देशाला समजल्या आहेत व आता आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या, इतकेच मागणे आहे.
  • शेतकऱ्यांच्या मुळावर आलेले तीन कृषी कायदे रद्द करा व तिरंग्याचाच मान राखा असे सांगणे व त्यासाठी आंदोलन करणे हा गुन्हा नाही! हातात व ट्रक्टरवर तिरंगा लावूनच शेतकरी त्यांच्या प्रश्नांसाठी लढतो आहे. शेतकऱ्यांना रस्त्यावर तडफडून मरू देणे हा तर तिरंग्याचा भयंकर अपमान आहे. तिरंग्याच्या रक्षणासाठी जवानांची फौज सीमेवर प्राणांची बाजी लावत आहे. त्यात पंजाबच्या शेतकऱ्यांची पोरे मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्यांचे बळी घेऊन तिरंग्याचा काय सन्मान राखणार आहात?
  • निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्या अर्थसंकल्पाच्या हृदयात गाव आणि शेतकरी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. हे टाळीचे वाक्य आहे, पण गाझीपूर सीमेवर आंदोलन करणारे लाखो शेतकरी तुमच्या मनमंदिरात आहेत की नाहीत? शेतकऱ्यांची लढाई स्वाभिमानाची आहे. तिरंगा हा स्वाभिमान आणि राष्ट्राभिमानाचे प्रतीक आहे हे खरेच, पण शेतकऱ्यांना पोलिसी दंडुक्याने चिरडणे हा तिरंग्याचा अपमान आहे हेदेखील तेवढेच खरे.
  • सरकारला तिरंग्याच्या अपमानाची चिंता वाटणे ही गर्वाचीच गोष्ट आहे. पण तिरंग्याचा तथाकथित अपमान फक्त आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे काय? शेतकऱ्यांचे आंदोलन संपविण्यासाठी पोलिसांच्या सशस्त्र फौजा उभ्या केल्या गेल्या आहेत. लोखंडी कठडे उभे करण्यात आले आहेत. डांबरी रस्त्यांवर खिळे मारून ठेवले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्लीत पुन्हा येऊ नये म्हणून काय हा कडेकोट बंदोबस्त! हे सर्व कठोर प्रयोग लडाखच्या सीमेवर केले असते तर चीनचे सैन्य आमच्या हद्दीत घुसून आपल्या बापाचीच जमीन असल्यासारखे बसून राहिले नसते.
  • चिनी सैन्य आमच्या हद्दीत घुसून बसले हादेखील तिरंग्याचाच अपमान आहे साहेब! लाल किल्ल्यावर तिरंगा फडकतोच आहे. गाझीपूरच्या शेतकरी आंदोलनातील प्रत्येक तंबूवर आणि टॅक्टरवरही तिरंगाच फडकतो आहे, पण चिनी सैन्याने आमची जमीन बळकावून तेथे त्यांचे लाल निशाण फडकवले हे कसे सहन करावे? तिरंग्याचा हा अपमान जनतेचे मन दुःखी करीत आहे. राष्ट्रीयत्वाची व्याख्या सगळय़ांसाठी एकच आहे.

ADVERTISEMENT
Previous Post

सीमावादाचे पडसाद : आरोपींच्या शोधात आलेल्या कर्नाटक पोलिसांना उमरगा तालुक्यात बदडले

Next Post

हरियाणाच्या जींदमध्ये आज शेतकरी महापंचायत होणार, 50 हजार लोक येण्याची शक्यता

Next Post

हरियाणाच्या जींदमध्ये आज शेतकरी महापंचायत होणार, 50 हजार लोक येण्याची शक्यता

ताज्या बातम्या

फरांदवाडी कृषिक्रांती कंपनीच्या ग्रेडिंग युनिटचा तालुक्यातील शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा : फिरोज शेख 

March 4, 2021

सातारा पालिकेकडून दोन ठिकाणी कोवीड लसीकरणाची सोय

March 4, 2021

फिटनेस टेस्ट घेताना रिक्षाला अपघात आरटीओ कार्यालयातील घटना : वाहन निरीक्षक जखमी

March 4, 2021

उपसरपंचांचा बंद बंगला फोडला, 2 लाखाचा ऐवज लंपास

March 4, 2021

संपतराव भोसले व पोपटराव भोसले या पिता-पुत्रांचे एकाच दिवशी निधन; राजाळे गावावर शोककळा

March 4, 2021

विक्रम भोसले अजितदादा पवारांच्या भेटीला;विकासकामांसाठी सर्वतोपरी सहकार्याचे दिले आश्‍वासन

March 4, 2021

आता 24 तासात कधीही, तुमच्या सोयीनुसार कोरोना लस घ्या! केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा

March 3, 2021

चाैथ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा कसून सराव, टेस्ट चॅम्पियनशिप फायनलवर नजर

March 3, 2021

‘कनेक्शन तोडून नाही तर हात जोडून महावितरण करणार थकीत वीज बिलाची वसुली

March 3, 2021

सोने स्वस्त : मागणी घटल्याने सात महिन्यांत सोने 10,887 रुपये स्वस्त; 56 हजारांचा टप्पा गाठून 45 हजारांपर्यंत घट

March 3, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.