भाजपा फलटण शहर व माऊली फौंडेशनच्या वतीने ‘रक्षाबंधन’ कार्यक्रमाचा शुभारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ४ सप्टेंबर २०२४ | फलटण |
फलटण शहर व परिसरातील ज्या महिलांनी आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने मला राखी बांधली आहे; त्यांच्या सन्मानासाठी मी माझ्या आयुष्यातील शेवटच्या श्वासापर्यंत कटिबद्ध राहणार असल्याचे मत माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांनी व्यक्त केले.

फलटणच्या नवलबाई मंगल कार्यालय येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतत्वाखाली भारतीय जनता पार्टी फलटण शहर व माऊली फौंडेशनच्या वतीने ‘रक्षाबंधन कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनुप शहा बोलत होते. या रक्षाबंधन कार्यक्रमाचा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या अ‍ॅड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून राखी बांधून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना शहा म्हणाले की, फलटणच्या गावठाणामधील महिला भगिनी यांना कोणत्याही व कसल्याही प्रकारची अडचण आली तर हा अनुप शहा त्यांच्यासोबत पूर्ण ताकदीने उभा राहणार आहे. शहरातील बहिणींसाठी काम करीत असताना कोणत्याही शासकीय योजना ह्या अगदी त्यांच्याकडे कार्यरत होत आहेत की नाही हेसुद्धा आम्ही नेहमी बघत आलो आहे. माजी खासदार रणजितसिंह यांच्या माध्यमातून फलटण शहरातील भगिनींना विविध योजनांचा लाभ देण्याचे काम केले आहे व यापुढे सुद्धा आम्ही त्यासाठी कार्यरत राहणार आहे.

नवलबाई मंगल कार्यालय येथे आयोजित ‘रक्षाबंधन कार्यक्रमात’ तब्बल १५०० भगिनींनी सहभाग घेतला होता.


Back to top button
Don`t copy text!