दैनिक स्थैर्य । दि. २९ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश जैन प्रकोष्ठ तर्फे राबविण्यात येणाऱ्या ”आत्मनिर्भर जैन” अभियानाचा प्रारंभ भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी झाला. केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या जैन समाजासाठीच्या योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले आहे. भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील , आ. गीता जैन , जैन महासंघाचे ललित गांधी आदी यावेळी उपस्थित होते.