
स्थैर्य, कोरेगाव, दि. 19 (अविनाश कदम) : कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ ली कोरेगाव, तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कोरेगाव त्यांचे वतीने शासनाच्या कृषी धोरणाच्या योजणे अंतर्गत शेतकऱ्यांना बांधावर खते पुरविणे योजनेचा शुभारंभ संघाच्या शाखा रहिमतपूर येथे करण्यात आला यामध्ये तालुक्यातील पिंपरी व पवार वाडी येथील शेतकरी गटांना खते पुरविण्यात आली त्यावेळी सातारा जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस चे जिल्हाध्यक्ष व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सातारा चे व्हा चेअरमन श्री सुनीलरावजी माने , रहिमतपूर नगरपरिषद चे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री आनंदरावजी कोरे ,कोरेगाव मार्केट कमिटीचे मा चेअरमन श्री अशोकराव पवार , कोरेगाव संघाचे चेअरमन श्री भागवतराव घाडगे , संचालक श्री विध्याधर बाजारे , श्री अधिक माने , तालुका कृषिअधिकारी सौ बावधनकर मॅडम , पिंपरी व पवारवाडी च्या कृषी सहाय्यक सौ पवार मॅडम व दोन्ही गावचे लाभार्थी शेतकरी गटाचे प्रतिनिधी श्री पवार व नानासाहेब पवार ,संघाचे व्यवस्थापक श्री राजेंद्र येवले व कर्मचारी वर्ग उपस्थित होते