
दैनिक स्थैर्य | दि. २५ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाद्वारे ‘विशेष रेल्वे प्रकल्प’ म्हणून घोषित करण्यात आलेल्या बारामती-लोणंद व्हाया फलटण रेल्वे मार्गासाठी फलटण तालुयातील सस्तेवाडी, कांबळेश्वर, खुंटे व सुरवडी या चार गावातील खाजगी क्षेत्रातील जमीन संपादित करण्याची कार्यवाही उपविभागीय अधिकारी कार्यालय, फलटण यांच्यामार्फत पूर्ण झाली आहे, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
सदर भूसंपादनांतर्गत फलटण तालुयातील सस्तेवाडी, कांबळेश्वर, खुंटे व सुरवडी या गावातील एकूण ४२ हेटर ४२ आर इतकी जमीन खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने संपादित करण्यात आली असून त्यासाठी रकम रूपये ६१,३७,००,३३७/- इतकी नुकसान भरपाई वाटप करण्यात आली आहे. तसेच रेल्वे अधिनियम (सुधारणा), २००८ अन्वये एकूण २ हेटर ६८ आर जमीन संपादित करण्यात आली असून त्यासाठी रकम रूपये ३,३७,५१,११९/- इतकी नुकसान भरपाई वाटप करण्याची कार्यवाही सुरू आहे.
उपविभागीय अधिकारी, फलटण या कार्यालयामार्फत बारामती-लोणंद व्हाया फलटण रेल्वे मार्गासाठी फलटण तालुयातील वरील चार गावातील एकूण ४५ हेटर १० आर इतकी खाजगी क्षेत्रातील जमीन संपादित करण्यात आली आहे, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.