दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण येथील विद्यानगरमध्ये राहणार्या गं.भा.लक्ष्मीबाई सीताराम शिंदे (मूळ रा. वारुगड (ऊगळेवाडी), ता. माण) यांचे बुधवार, दि.२३ रोजी सायंकाळी ७ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात महादेव (सर), भीमराव (सर्कल कृषी अधिकारी, पुणे), अर्जुन (सर) व विठ्ठल (साहाय्यक पोलीस आयुक्त, मुंबई) ही चार उच्चशिक्षित मुले आहेत.
लक्ष्मीबाई शिंदे यांचा अंत्यविधी आज, गुरुवार, दि.२४ रोजी सकाळी ८ वाजता फलटण येथील स्मशानभूमीत होणार आहे.
लक्ष्मीबाई यांना त्यांचे आप्तेष्ट, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.