देऊळगाव रसाळ येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबीर संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० जानेवारी २०२३ । बारामती । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्या प्रतिष्ठान संस्थेचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय व वसंतराव पवार विधी महाविद्यालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत, “युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास’ या उपक्रमांतर्गत ‘विशेष श्रमसंस्कार शिबिर मंगळवार दि. १७ जानेवारी ते सोमवार दि. २३ जानेवारी २०२३ या कालावधीत बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ येथे संपन्न झाले. शिबिराचा शुभारंभ प्राचार्य डॉ. अतुल रमाकांत शहाणे यांचे हस्ते तसेच मा. सरपंच सौ. वैशाली वसंतराव वाबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सात दिवसीय शिबिरामध्ये स्वयंसेवकांनी पर्यावरण जागृती, मतदार जनजागृती, अन्न सुरक्षा जनजागृती, जल-संधारण, ग्राम-मंदिर स्वच्छता, वृक्षारोपण, ग्रंथ-दिंडी, पथनाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी विविध उपक्रम राबविले.

त्याचबरोबर स्वयंसेवकांसाठी सातही दिवस योग तसेच उपयुक्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. तहसीलदार विजय पाटील, पोलिस निरीक्षक निसार शेख व पोलीस नाईक महेंद्र साळुंखे व रा. से. यो. जिल्हा समन्वयक डॉ. विलास कर्डिले यांनी शिबिरास सदिच्छा भेट दिली व स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. राजनकुमार बिचकर, मा. सरपंच सौ. वैशाली वसंतराव वाबळे, मा.उपसरपंच दत्तात्रय वाबळे, मा. मुख्याध्यापक महेश तावरे वि.प्र. चे वसंतराव पवार विद्यालय, आनंद रसाळ आणि दिपक वाबळे यांनी सहकार्य केले.

यावेळी स्वयंसेवकांनी आपले अनुभव व मनोगत व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!