दैनिक स्थैर्य | दि. १ ऑक्टोबर २०२४ | मुंबई |
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाकडून कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल दिला जाणारा ‘उद्यान पंडित’ पुरस्कार गिरवी, ता. फलटण गावचे सुपुत्र व कुरोली फूड्स, कोळकी, ता. फलटणचे संचालक तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा (यशवंत कृषी मंच अध्यक्ष), शेतीतज्ञ, कृषिरत्न रामदास भुजंगराव कदम यांना सपत्नीक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे, कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे (भा.प्र.से.), कृषी सचिव जयश्री भोज (भा.प्र.से.) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या वतीने कृषि, कृषिसंलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्ती/संस्था यांना त्यांच्या शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या शेतकरी व अधिकारी यांचा सत्कार व पुरस्कार वितरण समारंभ नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया (डोम), वरळी, मुंबई येथे संपन्न झाला.
शेतीतज्ज्ञ, कृषिरत्न रामदास भुजंगराव कदम यांना महाराष्ट्र शासनाचा ‘उद्यान पंडित’ पुरस्कार मिळाल्याबद्दल विधान परिषद माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, गोविंद मिल्कच्या संचालिका श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, गोविंद मिल्कचे संचालक श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती, फलटण माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले.