‘जेईई’ आणि ‘नीट’साठी ‘कोटा पॅटर्न’चा करिअर मार्गदर्शक सेमिनार बारामतीमध्ये संपन्न !


दैनिक स्थैर्य | दि. १ एप्रिल २०२४ | बारामती |
‘कोटा पॅटर्न’वर आधारित शिक्षण पध्दती प्रथमच महाराष्ट्रात आणणार्‍या ‘मोशन एज्युकेशन’ने बारामतीमध्ये करिअर मार्गदर्शक सेमिनार नुकताच आयोजित केला होता. शुक्रवारी संध्याकाळी मोशनच्या बारामती स्टडी सेंटरच्या वतीने समर्थनगर येथील न्यू कचेरी रोडवरील कवी मोरोपंत हॉल येथे आयोजित केलेल्या ह्या सेमिनारला बारामतीमधील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

देशातील सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि भौतिकशास्त्राचे शिक्षक श्री. नितीन विजय म्हणजेच एन. व्ही. सर हे मोशन एज्युकेशनचे संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांनी गेल्या १७ वर्षात लाखो मुलांकडून ‘जेईई’ आणि ‘नीट’ची तयारी करून घेतली आहे. ह्या सेमिनारमध्ये मार्गदर्शन करताना नितीन विजय यांनी स्पर्धा परीक्षांमधील यशासाठी योग्य रणनीतीचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच जेईई आणि नीटची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये त्यांच्या पालकांचाही मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.

मोशन एज्युकेशनबद्दल सांगताना एन. व्ही. सरांनी कमीतकमी शुल्कात दर्जेदार शिक्षण देणे हे ध्येय असल्याचे सांगितले. अद्ययावत अभ्यास साहित्य आणि टेक्नॉलॉजीसह अनुभवी प्राध्यापकांकडून इथे सर्वोत्तम तयारी करून घेतली जाते. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केल्यानंतर त्यांच्या नियमित चाचण्याही घेतल्या जातात. विद्यार्थ्यांना ‘क्लास रूम’ आणि ‘ऑनलाईन कोचिंग’ ह्या दोन्ही मार्गांनी प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांमधील उणीवा दूर करण्यासाठी मोशन एज्युकेशनने ‘होमवर्क मशीन’ तयार केले असून त्यामध्ये आर्टिफिशयल इंटेलिजियन्स आणि मशीन लर्निंगचा समावेश करण्यात आलेला आहे. यामुळे विद्यार्थी ज्या विषयात मागे आहे, त्या विषयाचा भरपूर सराव करून घेतला जातो. पूर्वी फक्त ‘कोटा’मध्ये उपलब्ध असलेल्या या सुविधा आता बारामतीमध्येही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

उत्तर आणि मध्य भारतामध्ये घवघवीत यश संपादन केल्यावर ‘मोशन एज्युकेशन’ आता दक्षिणेतही आपली मजबूत ऑफलाइन उपस्थिती प्रस्थापित करण्यासाठी सज्ज आहे. या ध्येयाअंतर्गत मोशनने पुढील आर्थिक वर्षात १०० नवीन केंद्रे सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या ५०,००० हून अधिक विद्यार्थी मोशनशी जोडलेले आहेत. १५ राज्यांमध्ये ६० केंद्रांसह संस्थेने देशात मजबूत अस्तित्व निर्माण केले आहे. दक्षिण भारतात आपली उपस्थिती वाढवण्यासाठी मोशन पहिल्या टप्प्यात ३० हून अधिक नवीन केंद्रे जोडेल. यासह, संस्थेला देशभरातील वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांची तयारी करणार्‍या दीड ते दोन लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची आशा आहे. मोशन एज्युकेशनमुळे ‘जेईई’ आणि ‘नीट’ला जाऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!