
स्थैर्य, वृत्तसेवा दि.18 : ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतमोजणीवेळी कोळकी ग्रामपंचायत निवडणूकीतील प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवार सौ.प्राजक्ता सागर काकडे (राजे गट अधिकृत) आणि सौ.मयुरी राजीव खिलारे (राजे गट बंडखोर) यांच्यातील लढ समसमान मते मिळाल्यामुळे ‘टाय’ झाली होती. त्यानंतर चिठ्ठीद्वारे विजयी उमेदवार निवडताना नशिब बलवत्तर ठरुन सौ.प्रजक्ता सागर काकडे या विजयीं झाल्या आहेत.