कोळकीत ग्रामपंचायत निवडणूकीत निकाल; भाजपची सपशेल धुलाई; अनेक ठिकाणी राजे गटाच्या बंडखोर उमेदवारांची सरशी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, वृत्तसेवा : फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीतील कोळकी गावचा निकाल नुकताच जाहीर झाला असून अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. कोळकीच्या निवडणूकीत माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वत: लक्ष घातले होते. शिवाय त्यांचे अनेक दिग्गज कार्यकर्तेही या निवडणूकीत सक्रीय सहभागी झाले होते. मात्र असे असताना देखील भाजप पुरस्कृत श्रीराम पॅनेलच्या एकाही उमेदवाराचा विजय झाला नसून या ठिकाणी भाजपची सपशेल धुलाई झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाच्या उमेदवारांना जरी यश आले असले तरी अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 6 मध्ये राजे गटाने तुषार नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देवून स्वत: श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत सत्यजीतराजे, श्रीमंत विश्‍वजीतराजे यांनी या ठिकाणी त्यांचा प्रचार केला होता. मात्र तरीही मतदारांनी त्यांना नाकारल्याने त्यांचा पराभव झाला आहे. याच प्रभागातील राजे गटाचे बंडखोर कार्यकर्ते बबलु निंबाळकर यांच्या मातोश्री सौ.लक्ष्मी रणजित निंबाळकर यांचा देखील विजय लक्षवेधी ठरला आहे.

कोळकी ग्रामपंचायत प्रभागनिहाय निवडूक आलेले उमेदवार.

प्रभाग क्रमांक 1 –
1) अक्षय शामराव गायकवाड (राजे गट बंडखोर उमेदवार)
2) निर्मला यशवंत जाधव (राजे गट अधिकृत उमेदवार)

प्रभाग क्रमांक 2 –
1) सोनाली विजय जठार (राजे गट अधिकृत उमेदवार)
2) रमेश चंद्रकांत नाळे (राजे गट बंडखोर उमेदवार)
3) स्वप्ना अनिल कोरडे (राजे गट अधिकृत उमेदवार)
> भाजपचे कामगार नेते बाळासाहेब काशिद यांच्या पत्नी सौ.सुनिता काशिद यांचा पराभव.

प्रभाग क्रमांक 3 –
1) सौ.रेश्मा संजय देशमुख (राजे गट अधिकृत उमेदवार)
2) सौ.रुपाली सागर चव्हाण (राजे गट अधिकृत उमेदवार)
3) संजय बबन कामठे (राजे गट अधिकृत उमेदवार)

प्रभाग क्रमांक 4 –
1) गणेश दिनकर शिंदे (राजे गट अधिकृत उमेदवार)
2) सौ.वर्षा ज्ञानदेव शिंदे (राजे गट अधिकृत उमेदवार)
3) सौ.प्राजक्ता सागर काकडे (राजे गट अधिकृत उमेदवार) आणि सौ.मयुरी राजीव खिलारे (राजे गट बंडखोर उमेदवार) – टाय

प्रभाग क्रमांक 5 –
1) विकास अशोक नाळे (राजे गट अधिकृत उमेदवार)
2) सौ.विजया संदीप नाळे (राजे गट अधिकृत उमेदवार)
3) डॉ.अशोक गेनबा नाळे (राजे गट अधिकृत उमेदवार)

प्रभाग क्रमांक 6 –
1) सौ.राधिका अशोक पखाले (राजे गट अधिकृत उमेदवार)
2) सौ.लक्ष्मी रणजितसिंह निंबाळकर (राजे गट बंडखोर उमेदवार) (बबलु निंबाळकर यांच्या मातोश्री)
3) शिवाजी मारुती भुजबळ (अपक्ष)
> तुषार नाईक निंबाळकर निंबाळकर यांचा पराभव


Back to top button
Don`t copy text!