मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ संगीतकार पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना श्रद्धांजली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, मुंबई, दि. १८ :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राच्या गुरुस्थानी असलेले पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राच्या नभांगणातील चमकता तारा निखळला आहे, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राची महानता जगभर पोहचविणारे उस्ताद म्हणून गुलाम मुस्तफा खान यांचे नाव घेतले जाते. जगभरातील शास्त्रीय संगीतातील दिग्गज त्यांना गुरुस्थानी मानतात. त्यांच्या निधनामुळे भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेचा महान पाईक, आणि अनेक पिढ्यांसाठीचे शास्त्रीय संगीताचे चालते बोलते विद्यापीठच आपल्यातून निघून गेले आहे. भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राच्या नभांगणातील चमकता तारा निखळला आहे. ऋषीतुल्य अशा उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!