दैनिक स्थैर्य । दि. ०६ एप्रिल २०२३ । कोळकी । कोळकी ग्रामपंचायत युवा सदस्य अक्षय शामराव गायकवाड यांची फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीवर ग्रामपंचायत अनुसूचित जाती या विभागामधून बिनविरोध निवड झाली आहे.
सध्या फलटण तालुक्यामध्ये बाजार समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहे. बाजार समितीच्या 18 जागांसाठी 121 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले होते. काल छाननी मध्ये त्यामधील दुबार उमेदवारी अर्ज व त्रुटी असलेले उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. यामध्ये ग्रामपंचायत अनुसूचित जाती मतदारसंघांमधून अक्षय शामराव गायकवाड यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यामुळे त्यांची बाजार समितीवर बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे.
अक्षय गायकवाड हे कोळकी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य असून विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख कोळकीसह पंचक्रोशीमध्ये आहे.
विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह फलटण शहर व तालुक्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अक्षय गायकवाड यांना बाजार समितीच्या निवडीबद्दल अभिनंदन देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.