शिष्यवृत्ती अर्ज करण्यास मुदतवाढ

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०६ एप्रिल २०२३ । सातारा । शैक्षणिक वर्ष 2022-23  साठी  शिष्यवृत्ती  शिक्षण फी, परीक्षा फी या योजनेचे अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील अर्ज महाडीबीटी पोर्टलवर नुतनीकरण (Renewal)  अर्ज व नवीनअर्ज नोंदणी  दि. 22/09/2022 पासून सुरूवात करण्यात आलेली  आहे.

जिल्हयातील काही महाविद्यालयात उशिरा प्रवेश होणे, उशिरा निकाल लागणे इ. कारणांमुळे ब-याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सादर करता आले नाहीत. मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासुन वंचित राहू नये म्हणून अद्याप शिष्यवृत्तीचे अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने मुदत वाढ दिलेली आहे. अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 30 एप्रिल 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

सातारा जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी सन 2022-23 मधील शिष्यवृत्तीचे अर्ज विहित मुदतीत भरुन महाविद्यालयांकडे सादर करावेत. तसेच सदरचे अर्ज संबधीत महाविद्यालंयानी समाज कल्याण विभागाकडे पडताळणी करून शिष्यवृत्ती अदागाई होणे कामी सादर करावेत.

संबंधीत महाविद्यालयांनी अर्ज भरण्याची सुविधा आपल्या महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्रामध्ये उपलब्ध करून द्यावी. तसेच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी अर्जभरण्याबाबत जनजागृती करावी. महाविद्यालयस्तरा वरील सर्व पात्र  अर्ज या कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीस्तव वर्ग करावेत, असे आवाहन नितीन उबाळे, सहायक आयुक्त,  समाज कल्याण, यांनी  केले  आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!