भाजप सावरकर गौरव यात्रेला वडूज हुतात्मा नगरीत उदंड प्रतिसाद


दैनिक स्थैर्य । दि. ०६ एप्रिल २०२३ । वडूज । भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष व माण- खटावचे आ. जयकुमार गोरे यांच्या खटाव तालुक्यातील वडूज नगरीत स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर गौरव यात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला. जखमी पायाच्या वेदना सहन करीत आ. गोरे यांनी हुतात्मा नगरीत पायी वारी करून स्वातंत्रवीर सावरकर यांच्या बद्दल कृज्ञतापूर्वक नमन केले.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रखर राष्ट्रवादीच्या अग्नीकुंडत पुढे घेऊन ज्यांनी क्रांतीची मशाल तेवित ठेवली. ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची गौरव यात्रा दिनांक एक ते सहा एप्रिल या कालावधीमध्ये सुरू झाली होती. खटाव तालुक्यातील हुतात्म्याचे नगरी असलेल्या वडूज नगरीत भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या या गौरव यात्रेत स्वातंत्रवीर सावरकरांच्या सोबतच भाजपचे माण- खटाव चे आ. जयकुमार गोरे यांचा ही जयघोषकरण्यात आला. अखेर आमदार गोरे यांनीच माझा जय जयकार न करता स्वतंत्र वीर सावरकरांचा जय जयकार करा असे स्पष्ट करावे लागले.

याबाबत माहिती अशी की, वडूज ता. खटाव या ठिकाणी भारतीय जनता पार्टी माण- खटाव विभाग कार्यकर्त्यांच्या वतीने प्रकार राष्ट्रवादीचे अग्नि कुंडात मोठ्या संख्येने सामील व्हा अशा फलकाने संपूर्ण वडूज नगरीमध्ये वातावरण निर्मिती करण्यात आली होती. भारत मातेचे सुपुत्र आम्ही नसान सात वाहते भगवे रक्त. हिंदू तर हेच आमचे राष्ट्रीयत्व. आम्ही वीर सावरकर भक्त. असा अत्यंत अभिमानास्पद स्लोगन असलेल्या फलकावर हे स्लोगन गीत पाहून अनेकांना छाती भरून येत होती.

पूर्वी हुतात्मा नगरीत गांधी टोपी घालून कार्यकर्ते सहभागी होत होते. आता भगव्या टोपीने संपूर्ण परिसर भगवेमय झाले होते. आ. गोरे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दलच अभिमान बाळगा. मी कुठलाही हार तुरे सत्कार स्वीकारणार नाही. फक्त स्वातंत्रवीर सावरकर यांची प्रतिमा स्वीकारतो. असा त्यांनी खुलासा केला. आदरणीय काँगेस नेत्या इंदिरा गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांना मानधन सुरू केले होते. त्यांची पोस्टची तिकीट काढली होती. आज त्या वरून बघत असतील की, आपलाच नातू असा कसा वागतो? अशी त्यांनी टीका करून सावरकर गौरव यात्रेत श्रीमती इंदिरा गांधींच्या कार्याचा ही गौरव केला. सावरकर यांची बदनामी कधी ही खपवून घेणार नाही असे ही त्यांनी स्पष्ट केले.

वडूज नगरीत सकाळी लवकर या गौरव यात्रेचे नियोजन केले होते. परंतु तासभर लोक सिद्धिविनायक मंदिरात समोर जमली नसल्याने सुमारे दीड तास या गौरव यात्रेसाठी उशीर झाला. अखेर भर उन्हातही अडीचशे ते तीनशे डोक्यावर आम्ही सावरकर टोपी व गळ्यात भगवा फड्या घेऊन ग्रामीण भागातून आलेले कार्यकर्ते हुतात्मा चौकात गेले. त्या ठिकाणी हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

या वेळेला भाजप तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण, माण तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, अनिल माळी, सौ मनिषा काळे, सौ रेश्मा बनसोडे, प्रदीप शेटे, किशोरी पाटील, आकाश जाधव, ओंकार चव्हाण, सदाशिव खाडे, उमेश पाटील, पोपट राऊत, डॉ वैभव माने, प्रसाद निंबाळकर तुकाराम खाडे, भगवान गोरे,सिद्धार्थ गुंडगे, प्रल्हाद निकम, गणेश सत्रे, शेखर पाटोळे, सोमनाथ बुधे, खंडू कुलकर्णी, व भाजपचे निष्ठावंत , तुषार जगदाळे, अमोल मोरे, उज्वल देशमुख, लाला साहेब माने, आनंद देवकर, तसेच धनाजी चव्हाण, चंद्रकांत कोकाटे यांनी घोषणाबाजी देऊन कार्यक्रमांमध्ये जान आणली. रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे काही पदाधिकारी तसेच भाजप महिला पदाधिकारी श्रीमती गोडसे,

सौ साधना गुंडगे, शोभा राऊत, कुमोदीनी गायकवाड, सारिका शेंडे, लिंगराज साखरे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री सिद्धीिनायक मंदिरात ढोल ताशांच्या गजरात यात्रेचा समारोप करण्यात आला. तत्पूर्वी संपूर्ण परिसरात गौरव यात्रा काढून लोकांच्या मध्ये संदेश पोहचविला.

यावेळी चंद्रकांत कोकाटे यांनी सूत्रसंचालन व अंबादास भंडारे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वडूज पोलीस ठाण्याचे प्रभारी स. पो. नि. दत्तात्रय दराडे, दोलताडे, दिपक देवकर, लोखंडे, सौ कदम व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


Back to top button
Don`t copy text!