कोळकी येथे पतंग स्पर्धा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑगस्ट २०२३ | फलटण |
कोळकी (ता. फलटण) येथे पतंग स्पर्धा उत्साहात पार पडली. यावेळी स्पर्धकांचा उत्साह बघण्यासारखा होता. ही स्पर्धा पाहण्यासाठी शेकडो ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

या स्पर्धेचे आयोजन अक्षय दळवी, विशाल चव्हाण, राहुल शिंदे, अमरदीप भुजबळ, चैतन्य दळवी, विशाल रणदिवे, अजय दळवी, सौरभ घोरपडे, ऋषभ लोहाना व मित्रमंडळाने केले होते.

या स्पर्धेस कोळकीच्या सरपंच सपना कोरडे, उपसरपंच विकास नाळे, ग्रामपंचायत सदस्य सागर काकडे, विक्रम पखाले, संजय कामठे सर, बाळासाहेब काशिद, अंबादास दळवी सर, संदीप नेवसे, रेश्मा संजय देशमुख व ग्रामस्थ उपस्थित होते.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक आकाश राजमाने पटकावला, द्वितीय क्रमांक अर्जुन कापसे तर तृतीय क्रमांक दत्ताजी जाधव यांनी पटकावला. या विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!