दैनिक स्थैर्य | दि. २२ जून २०२४ | फलटण |
महात्मा फुले भाजीमंडई संकुल, फलटण शेजारील खाऊगल्ली (ता. फलटण, जि. सातारा) येथे २० जून २०२४ रोजी रात्री ८,३० वाजता जेवण मागण्यासाठी गेलेल्या मुलावर चाकूने वार करून त्यास जखमी केल्या प्रकरणी फलटण शहर पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकुश लालासो चव्हाण (रा. आडकेवस्ती, ठाकुरकी, ता. फलटण) असे आरोपीचे नाव आहे.
या घटनेची थोडक्यात माहिती अशी, २० जून रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास महात्मा फुले भाजीमंडई संकुल, फलटण शेजारील खाऊगल्ली येथे सोहम गितेश शिंदे (वय १२) हा जेवण मागण्यासाठी गेला होता. त्यावेळी अंकुश लालासो चव्हाण त्याच्यावर चाकूने वार करून जखमी केले, अशी तक्रार शहर पोलिसात त्याच्या आईने दिली आहे.
या घटनेचा अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.