
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ८ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त माता रमाई मित्रमंडळ मंगळवार पेठ, फलटण यांच्या वतीने सालाबादप्रमाणे खिरवाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेला उपस्थित महिला यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
माता रमाई यांच्या जयंतीनिमित्ताने माता रमाई मित्रमंडळ यांच्या वतीने पुढील वर्षापासून आदर्श माता पुरस्कार सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे.
सूत्रसंचालन बापू ढावरे यांनी केले. तसेच मंगळवार पेठेमधील महिला तरुण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
