दैनिक स्थैर्य | दि. २६ जानेवारी २०२४ | फलटण |
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या राजुरी गावच्या दौर्यात श्रीराम कारखान्याचे संचालक मच्छिंद्र सांगळे, सोमनाथ माळवे यांच्यासह सहकार्यांनी खासदारांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी सोसायटीचे संचालक, उद्योजक पोपटराव साळुंखे कार्यकर्त्यांबरोबर भाजपमध्ये दाखल झाले होते. राजुरीत राष्ट्रवादीच्या तीन गटातील एक गट भाजपच्या संपर्कात आहे.
दिवंगत खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक अनिल जाधव यांची आजारपणाची चौकशी खासदार रणजितसिंह यांनी घरी जावून केली. कायम तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही यावेळी जाधव यांनी दिली.
यावेळी बजरंग गावडे, संतोष गावडे, डॉ. मधुकर माळवे उपस्थित होते.