
स्थैर्य, फलटण, दि. 7 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ५ (अनुसूचित जाती – महिला) मधून खासदार गटाकडून मलठण येथील सौ. कविताताई राहुल कांबळे यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे.

सौ. कविताताई यांचे पती राहुल कांबळे हे सगुणामातानगर, मलठण येथील सिद्धीविनायक मंदिराचे अध्यक्ष आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
कांबळे कुटुंब स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या काळापासून निंबाळकर कुटुंबासोबत एकनिष्ठ राहून कार्यरत आहे.
गेल्या चाळीस वर्षांपासून राहुल कांबळे यांच्या कुटुंबीयांचे सगुणामातानगर येथे दुकान आहे. त्यामुळे त्यांचा परिसरात दांडगा जनसंपर्क आहे. यासोबतच ग्रामीण भागातही त्यांचा मोठा परिचय असल्याने त्यांचा उमेदवारीसाठी विचार केला जात असल्याची चर्चा आहे.
