उत्कृष्ट व्यावसायिक म्हणून कौस्तुभ गांधी सन्मानित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ९ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
येथील प्रसिद्ध असणार्‍या ‘शांतीकाका सराफ अँड सन्स’चे सर्वेसर्वा कौस्तुभ नितीन गांधी (शेठ) यांना सराफी व्यवसायामधील उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

‘शांतीकाका सराफ अँड सन्स’ या व्यवसायाच्या माध्यमातून गेले काही वर्षांपासून कौस्तुभ गांधी कार्यरत आहेत. पारंपरिक असणार्‍या व्यवसायामध्ये आधुनिकतेची कास देत कौस्तुभ गांधी यांनी आपल्या व्यवसायामध्ये अनेक बदल करत फलटणसह लोणंद व शिरवळ येथेही येथेही शांतीकाका सराफ अँड सन्सची शाखा सुरू करत उत्कृष्ट असा व्यवसाय वाढवला आहे.

सराफी व्यवसायामध्ये असणार्‍या स्पर्धांचा विचार करत गेल्या काही वर्षांपासून कौस्तुभ गांधी यांनी आपल्या व्यवसायाचा गाढा अभ्यास करत त्यामध्ये आवश्यक असणारे बदल तातडीने केले आहेत. राज्यातील इतर मोठ्या ब्रँड्सप्रमाणे आता शांतीकाका सराफ अँड सन्स काम सुरू आहे. ग्राहकांच्या पसंतीस उतरल्यामुळे ग्राहकांचा विश्वास हा शांतीकाका सराफ अँड सन्सवर जडलेला आहे.

ग्राहकांनी सोने व चांदीचे दागिने खरेदीसाठी शांतिकाका सराफ अँड सन्सशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्कासाठी फलटण ८३०८१०९८८८, लोणंद ८१८१९२२६६६, शिरवळ ८५९७५९६७७७ हे नंबर उपलब्ध आहेत.


Back to top button
Don`t copy text!