स्थैर्य, दि.२१: जवळपास गत १० महिन्यांपासून
काश्मीरमध्ये इंटरनेट २जी स्पीडवर सुरू आहे. यापूर्वी तर इंटरनेट बंदच
होते. परिणामी ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच
व्यवसायावरही याचा परिणाम झाला आहे. मात्र येथील काही तरुणांनी २जी स्पीड
असूनही आपल्या व्यवसायाला उंचीवर नेऊन ठेवले आहे. अशा काही तरुण
उद्योजकांची उलाढाल कोट्यवधींमध्ये आहे. असेच दोन युवा उद्योजक म्हणजे समी
उल्लाह व आबिद राशीद. या दोघांनीही ‘फास्ट बीटल’ नावाने डिलिव्हरी सर्व्हिस
सुरू केली आहे.
ऑनलाइन
व्यवसाय करणाऱ्या सुमारे ५०० काश्मिरी तरुणी यांच्या कंपनीशी जोडल्या
गेल्या असून देशभरात आपल्या वस्तू विकत आहेत. २५ कर्मचारी असलेल्या या
कंपनीची उलाढाल ५ कोटींची आहे. २८ वर्षीय जान मोहंमद यांनी बुरूज नावाने
कंपनी सुरू केली आहे. ते केशर व सुका मेव्याचा ऑनलाइन व्यवसाय करतात.
त्यांना बहुतांश ऑर्डर सोशल मीडियावरील पेजवरून मिळतात. अनेक व्यापाऱ्यांना
इंटरनेटच्या कमी वेगामुळे अडचणी येत असताना या तरुणांच्या व्यवसायात मात्र
वाढ होत आहे. तौसीफ युसूफ लेबनॉनमध्ये ई-कॉमर्स कंपनीत काम करत होते. गत
ऑगस्टमध्ये ते भारतात परतले आणि पाच महिन्यांपूर्वी त्यांनी ऑनलाइन
ऑर्गेनिक ग्रॉसरी स्टोअर सुरू केले आहे. बीटेक काश्मीर या स्टोअरवर सौदी
अरेबियातून आयात केलेले खजूर, मध, तूप आणि सुका मेवा मिळतो.
काश्मीरची प्रगती दर्शवणाऱ्या ३ कथा दिवसाला ४०० ऑर्डर, युवकांना रोजगार :
उत्तर काश्मिरातील मलिक आदिल ‘ग्रॉसरी’ नावाने ऑनलाइन स्टोअर चालवतात. ते
सौंदर्य प्रसाधन, कपड्यांपासून तयार वस्तू विकतात. आधी नोकरी करत होते,
मात्र नंतर नोकरी सोडून स्वत:चा अॅपबेस्ड व्यवसाय सुरू केला. इंटरनेटच्या
कमी वेगाचा परिणाम होणार नाही या पद्धतीने अॅप डिझाइन केले आहे. ५०
हजारांपेक्षा जास्त लोक अॅप वापरतात. कंपनीत ४० युवक कार्यरत आहेत. दररोज
४०० हून जास्त ऑर्डर येतात.
दोन
तरुणींनी इन्स्टाग्रामवर व्यवसायाला केली सुरुवात, २० महिला जोडल्या
गेल्या : ओमायरा आणि बिनीशने २०१५ मध्ये ‘क्राफ्ट वर्ल्ड काश्मीर’ हे
ऑनलाइन आऊटलेट सुरू केले. येथे फ्लोरल ज्वेलरीपासून फॅशनेबल वस्तू मिळतात.
इन्स्टाग्रामवर डिझाइन पोस्ट करून ऑर्डर स्वीकारतात. ओमायरा म्हणाल्या,
२जीमुळे अडचण असतानाही व्यवसाय टिकवून धरला. २० महिलांना नोकरी दिली आहे.
वर्षाला २५ लाखांची उलाढाल आहे.
काश्मिरी मधाची देशभरात ऑनलाइन विक्री :
३१ वर्षीय मीर इक्बाल आधी पत्रकार होते, मात्र आता त्यांनी मीर अॅग्रो
फर्म नावाने ऑनलाइन व्यवसायास सुरुवात केली आहे. मीर मध, तूप, केशर
इत्यादीचा व्यवसाय करतात. या व्यवसायातून १० लोकांना रोजगार मिळाला.
दिल्ली, मुंबई, बंगळुरू व कोलकातासारख्या शहरांतून मधाला मागणी आहे. मीर
सांगतात की, काश्मिरी मध ७०० ते ८०० रुपये किलो विकला जातो.