कास, ठोसेघरला दिवाळीनंतर भेट देणार : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 


स्थैर्य, कास (जि. सातारा), दि.२ : कास, वजराई, तसेच ठोसेघर धबधबा परिसरातील पर्यटन व्यवसाय वाढीस लागण्यासाठी व आसपासच्या गावांतील जनतेला रोजगार उपलब्ध होण्यासाठी दिवाळीनंतर प्रत्यक्ष भेट देऊन या विभागातील विकासकामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या भागातील शिष्टमंडळास दिले.

माजी आमदार व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दगडूदादा सकपाळ यांच्यासह स्थानिक लोकांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी झालेल्या चर्चेचा तपशील सांगताना श्री. सपकाळ म्हणाले, “”जिल्हा विविध निसर्गसंपदांनी समृद्ध असून, पर्यटनाच्या दृष्टीने म्हणावा तसा विकास झाला नाही. जिल्ह्यातील फुलांसाठी प्रसिद्ध जागतिक दर्जाचे कास पठार, आशिया खंडातील उंच भांबवली वजराई धबधबा, ठोसेघर धबधबा व परिसरातील विविध पर्यटन स्थळांच्या व आसपासच्या गावांच्या विकासकामासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.”


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!