राष्ट्रीय ओबीसी महासंघा तर्फे कोरोना योध्दाचा सन्मानस्थैर्य, वावरहिरे, दि.२: संपूर्ण जगभरात गेले सहा सात महिने कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. या काळात सर्व काही विस्कळीत झाले. याचा जोरदार फटका बसला तो म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईला. त्यावेळी गावातून मुबंई येथे कामानिमित्त गेलेले अनेक चाकरमानी लोक पुन्हा गावी परतले. या सर्वांना या कोरोना रोगाच्या लॉकडाऊन काळात मदत करण्यासाठी समाजातील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती धावली. प्रत्येकजण आपापल्या परीने या कोरोना महामारीच्या काळात एकमेकांना सहकार्य केले.कोरोना विषाणुचा धोका आपल्या गावात वाढु नये तसेच सर्वाचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आज वावरहिरे गावचे सरपंच चंद्रकांत वाघ, उपसरपंच सुरेशराव काळे, मुख्याध्यापक हणमंतराव अवघडे,पोलिस पाटील सौ भारती भोसले, दिपक भोसले, तुलशीराम यादव,सदाशिव भोसले, विलास अवघडे,ज्ञानेश्वर गुळीक,सुनंदा अवघडे,बिलकेश शेख तसेच आरोग्य विभागातील डाॅ दिपक येवले,श्रीमती सोनवलकर, नितीन खुळे,आशा सेविका कविता अवघडे,राजश्री जाधव,उमा बोराटे,उषा कवळे गट प्रवर्तक अश्विनी बोराटे इत्यादीचा उल्लेखनिय कार्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिव श्री रघुनाथ ढोक यांच्या हस्ते छ. शाहु महाराज,डाॅ आंबेडकर, क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांची एकञित असलेली फोटो फेम,सन्मानपञ,शाल ,श्रीफळ देवुन या सर्वाचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी जेष्ठ नागरिक जगन्नाथ खुस्पे, आरोग्य कर्मचारी,ग्रां प कर्मचारी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.यावेळी रघुनाथ ढोक बोलताना म्हणाले की, कोरोना रोगाचा लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वांनी घेतलेली मेहनत ही वाखाणण्याजोगी होती. सर्वांनी एकमेकांना माणुसकीच्या भावनेतून जमेल तसे सहकार्य केले. कोरोनामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. तरीही त्या अडचणींना तोंड देत आजही माणूस आपली माणुसकी विसरला नाही. ह्याचा अनुभव आमच्या गावात आला. यापुढेही आपण सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. माणुसकी जपलेल्या या कोरोना योद्धाचा सन्मान हा आमच्यासाठी भाग्याचा असल्याचे म्हटले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हणमंतराव अवघडे यांनी केले तर आभार तुलशीराम यादव यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन व वावरहिरे ग्रामपंचायत, यांनी परिश्रम घेतले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!