हवामानाच्या लहरीपणाचा कास पठाराला फटका; पर्यटकांची निराशा वाढली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

जागतिक वारसास्थळ कास पठारावर पावसाच्या अभावामुळे फुलांचा बहर ओसरला असून सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गर्दी करणाऱ्या पर्यटकांच्या पदरी निराशा पडत आहे.

स्थैर्य, कास, दि. ०५ ऑक्टोबर : जागतिक वारसास्थळ कास पुष्प पठाराचा यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून बदलत्या हवामानाचा मोठा फटका पठाराला बसला आहे. गांधी जयंती आणि शनिवार-रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे हजारो पर्यटकांनी कासवर हजेरी लावली; मात्र गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने दांडी मारल्याने फुलांची संख्या कमालीची घटली असून पर्यटकांची निराशा होत आहे.

इतर आकर्षणे ठरताहेत दिलासादायक

पठारावर पावसापासून रक्षण करणाऱ्या छत्र्यांचा वापर पर्यटक उन्हापासून वाचण्यासाठी करताना दिसत आहेत. पठारावरील फुलांचा बहर कमी झाला असला तरी कुमुदिनी तलावावर कुमुदिनीची फुले चांगल्या प्रकारे उमलली आहेत. यंदा कास समितीने विविध दर्शन पॉइंट आणि मंडपघळ यांसारखे नवीन पॉइंट विकसित केल्याने पर्यटकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. समितीने १० ऑक्टोबरपर्यंतचे आगाऊ ऑनलाइन बुकिंग पूर्ण झाल्याने आता थेट पठारावरच तिकीट विक्री सुरू केली आहे.

स्थानिकांचा रोजगार संकटात

येत्या काही दिवसांत पावसाने हजेरी लावल्यास पठारावरील जैवविविधता अजून १५ दिवस टिकून राहील. सामान्यतः दसरा व दिवाळीपर्यंत चालणारा हा पर्यटन हंगाम यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे मुदतीआधीच धोक्यात आला आहे. यामुळे कास परिसरातील हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिक ग्रामस्थांच्या रोजगारावर मोठे संकट निर्माण झाले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!