स्थैर्य, फलटण दि. 10: साखरवाडी ता. फलटण येथील कांताबाई किसनराव भोसले वय ६८ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. जेष्ठ पत्रकार व ग्राहक चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते किसनराव भोसले यांच्या त्या पत्नी होत.
त्यांच्या पश्चात पती, मुले, विवाहीत मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिकसह विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध सहकारी, सामाजिक संस्थाचे पदाधिकारी, प्रतिनिधी, व्यापारी यांच्यावतीने श्रध्दांजली वाहण्यात आली.