मी राष्ट्रवादीमध्येच; निंभोरेच्या सरपंच सौ. कांचन निंबाळकर यांचे प्रतिपादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 13 डिसेंबर 2023 | फलटण | मी पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच आहे व यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच कामकाज करणार आहे. मागील काही काळामध्ये काही गैरसमजुत झाल्या होत्या. त्या आता सर्व दूर झाल्या आहेत. आगामी काळामध्ये निंभोरे गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमचे नेते विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात कामकाज करणार आहे; असे मत निंभोरे गावच्या सरपंच सौ. कांचन निंबाळकर यांनी व्यक्त केले.

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील “सरोज – व्हिला” या निवासस्थानी आयोजित सत्कार समारंभानंतर निंभोरे गावच्या सरपंच सौ. कांचन निंबाळकर बोलत होत्या. यावेळी माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले, निंभोरेचे उपसरपंच मुकुंद रणवरे यांच्यासह विविध ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!