पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘जॉय मिनी ट्रेन’ सुरू करणार

पालकमंत्री ना. शंभूराज देसाई : प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, मुंबई, दि. 18 सप्टेंबर : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांमध्ये पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून महाबळेश्वर-तापोळा आणि कोयनानगर-नेहरूनगर या दोन ठिकाणी ‘जॉय मिनी ट्रेन’ सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री व सातार्‍याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई देण्यात आले.

देशातील महत्त्वाच्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करणार्‍या आणि पर्यटन स्थळांचे कमी वेळेत भ्रमण करून देणार्‍या ‘जॉय मिनी ट्रेन’ अत्यंत लोकप्रिय ठरत आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर या उपक्रमाची सुरूवात करण्यात यावी, असे आदेश यावेळी देण्यात आले. राज्यात माथेरानच्या धर्तीवर हा उपक्रम सुरू करण्यासाठी सर्व स्थानिक परवानग्या घेणे, तांत्रिक बाबी तपासणे आणि या उपक्रमातून आर्थिक नफा तपासणे आवश्यक आहे. कमी खर्चात आणि अत्यंत आकर्षक पद्धतीने हा उपक्रम कसा सुरू करता येईल, याची खात्री विभागाने करून घ्यावी, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.

या बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!