मच्छिंद्र मुळीक यांच्या ऊस प्लॉटला कृषी सहसंचालक अजय कुलकर्णी यांची भेट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 13 एप्रिल 2025। फलटण । सासकल, ता. फलटण येथील प्रगतशील शेतकरी मच्छिंद्र मुळीक यांच्या ऊसाच्या प्लॉटला कोल्हापूर विभागीय कृषी सहसंचालक अजय कुलकर्णी यांनी भेट दिली.

याठिकाणी माहिती देताना अजय कुलकर्णी म्हणाले, कृषी विभागामार्फत फुले सुपर केन नर्सरीपासून ऊस लागवड केली.ऊस रोपवाटिका तयार करताना तंत्रज्ञान, बेणे प्रक्रिया, खत बेसल डोस वापर, 7 फूट बाय 1.5 फूट अंतरावर पट्टा पद्धतीद्वारे उसाची लागवड याविषयी माहिती दिली. 40 गुंठे क्षेत्रात 4000 रोपाची लागवड केली.

एका उसाला 8 ते 14 फुटवे आहेत एका उसाचे 2 किलो प्रमाणे वजन अपेक्षित ठेवल्यास एकरी 100 टन उत्पादन येणार आहे.

सासकलमध्ये कृषी विभागामार्फत 18 सुपर केन नर्सरीद्वारे 90 हजार रोपे तयार केली आहेत. 22 एकर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आली आहे. कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी फुले सुपर केन नर्सरीद्वारे उसाची लागवड करण्याचे आवाहन केले.

यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी खलीद मोमीन, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, मंडल कृषी अधिकारी शहाजी शिंदे, कृषि पर्यवेक्षक अजित सोनवलकर, कृषी सहाय्यक सचिन जाधव व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!