स्थैर्य, नवी दिल्ली, दि.८: रिलायन्स जिओ कंपनीने सन 2021 सालच्या मध्याला 5 जी दूरसंचार सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे अशी माहिती या कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज येथे दिली.
इंडियन मोबाईल कॉंग्रेस मध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की देशात 5 जी सेवा सुरू करण्यासाठी धोरणात्मक पावले लवकर टाकली गेली पाहिजेत. आणि ही सेवा सर्वांना परवडणाऱ्या िंकंमतीत असावी असाही प्रयत्न केला गेला पाहिजे.
रिलायन्स जिओ कंपनी स्वदेशी तंत्रज्ञानाची यंत्रणा उभारून 5 जी सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. त्यासाठी तंत्रज्ञानाला जे सुटे भाग लागतील तेही स्वदेशी बनावटीचे असावेत असाही आमचा प्रयत्न असणार आहे. आत्मनिर्भर भारत संकल्पनेला अनुकुल अशी आमची 5 जी सेवा असेल असेही त्यांनी नमूद केले.