जिओ हॅप्टिकने ‘व्हॉट्स ऍप अँड कॉमर्स’ उत्पादने लॉन्च केली


दैनिक स्थैर्य । दि. १८ सप्टेंबर २०२२ । मुंबई । सणासुदीचा काळ जवळ आलेला असतानाच, जगातील सर्वांत मोठ्या संभाषणात्मक वाणिज्य कंपन्यांमध्ये मोडणारी, जिओ हॅप्टिकने  ‘हाइप’ या एक्स्लुजिव उत्पादन लाँच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या बहुप्रतिक्षित कार्यक्रमाच्या माध्यमातून, जिओ हॅप्टिकने आगामी सणासुदीतील विक्री हंगामासाठी प्रोअॅक्टिव मेसेजिंग, कॉमर्स प्लस, क्लिक टू हॅप्टिक अॅड्स आदी नवीन वाणिज्य उत्पादने/सुविधा बाजारात आणल्या.

या लाँचचा एक भाग म्हणून, जिओ हॅप्टिकद्वारे बाजारात आणली जाणारी उत्पादने, ब्रॅण्ड्सना त्यांच्या मार्केटिंग बजेट्सचा पुरेपूर उपयोग करण्यात, प्रचंड विक्री साध्य करण्यात व ग्राहकांसोबत संवाद अधिक सुधारण्यात मदत करतील. प्रोअॅक्टिव मेसेजिंग हे उत्पादन ग्राहकांशी संभाषण करणाऱ्या टीम्सना व्हॉट्सअॅप अधिसूचनांच्या (नोटिफिकेशन्स) माध्यमातून नवीन संभाषण सुरू करण्यात मदत करते. दुसरे उत्पादन कॉमर्स प्लस संभाषणांच्या माध्यमातून खरेदी सुलभ करते, उत्पादनाचा शोध घेणे आणि व्हॉट्सअॅप, फेसबुक व इन्स्टाग्रामद्वारे उत्पादनासंदर्भातील एफएक्यू यांच्या मदतीने खरेदी सोप्या पद्धतीने करता येते.

क्लिक टू हॅप्टिक अॅड्स हे उत्पादन ब्रॅण्ड्सना जाहिरातींच्या माध्यमातून वापरकर्त्यांशी थेट व व्यक्तिगत पातळीवर संभाषण सुरू करणे शक्य करून देते. या उत्पादनामुळे शेवटी क्लिक-थ्रू दर आणि जाहिरातीच्या खर्चाचा मोबदला अधिक प्रमाणात मिळू लागतो. आणखी एक तारांकित उत्पादन म्हणजे इन्स्टाग्राम कॉमर्स. जिओ हॅप्टिकच्या या उत्पादनामुळे क्लिक-टू-डीएम जाहिराती आपल्या आयव्हीएद्वारे उल्लेखांना (स्टोरी मेन्शन्स), डीएम्स व कमेंट्सना प्रतिसाद देऊ शकतील आणि खरेदीच्या संपूर्ण प्रवासात वापरकर्त्यांना मार्गदर्शन करतील. आणि अखेरीस, आपल्या फोर्टीप्लस इंटिग्रेशन्स या उत्पादनाच्या माध्यमातून, ब्रॅण्डचा आयव्हीए सहजपणे जोडला जाऊ शकेल व पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या सीएक्स साधनांसोबत प्रभावीपणे काम करू शकेल, याची निश्चिती जिओ हॅप्टिक करते.

हॅप्टिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक आकृत वैश, “मेसेजिंग (संदेशवहन) हे एक माध्यम म्हणून ब्रॅण्ड्सना मोठ्या संख्येतील ग्राहकांशी थेट संभाषणामार्फत विक्रीची उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करत आहे. जगातील सर्वांत मोठी व्हॉट्सअॅप चॅटबॉट पुरवठा करणारी कंपनी म्हणून आम्ही देत असलेली एक्स्लुजिव उत्पादने व सुविधा, उद्योगांना त्यांची उत्पादने सक्रियपणे ग्राहकांना विकण्यात, सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा खरेदी अनुभव डिजिटाइझ करण्यात तसेच सणासुदीच्या काळातील प्रचंड मागणी पूर्ण करण्यात उपयुक्त ठरतील. याशिवाय आमचे सोल्यूशन जाहिराती, एसएमएस व इन्स्टाग्रामसारख्या नवीन माध्यमांतून ब्रॅण्डची दृश्यमानता लक्षणीयरित्या वाढवेल आणि त्यामुळे ब्रॅण्ड्सना खऱ्या अर्थाने सर्व माध्यमांचा उपयोग करणारे (ऑम्नीचॅनल) धोरण विकसित करता येईल.”

ब्रॅण्ड्सना विक्री व सपोर्टच्या वाढत्या मागण्यांचे व्यवस्थापन करतानाच, त्यांची उद्दिष्टे गाठून देण्यात मदत करणारे आदर्श माध्यम म्हणून, व्हॉट्सअॅप उदयाला आले आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सक्रिय ग्राहक संवाद धोरणांच्या वाढत्या महत्त्वाशी हा उत्पादन लाँच सोहळा संलग्न होता. या सोहळ्यात उद्योगक्षेत्रातील आघाडीचे नेते, ब्रॅण्ड्सना विक्रीचे विक्रम मोडण्यात मदत करणाऱ्या, विशेषत्वाने आगामी दिवाळी व सणासुदीच्या काळात उपयुक्त ठरणाऱ्या विविध व्हॉट्सअॅप अभियान धोरणांवर चर्चा केली.

जिओ मोबिलिटीच्या प्लॅटफॉर्म्स अँड प्रोडक्ट विभागातील सतिंदर सिंग, जिओमार्टच्या उत्पादन व्यवस्थापन विभागाचे संचालक अर्चित श्रीवास्तव, नेटमेडचे चीफ कम्युनिकेशन्स ऑफिसर ब्रुस श्वाक, पेपरफ्रायमधील ग्राहक सेवा विभागाचे प्रमुख नवीन अभिषेक, बोटमधील डी२सी न्यू इनिशिएटिव्ह्जचे उपाध्यक्ष सौरभ भंडारी आणि व्हॉट्सअॅप फॉर बिझनेसचे पार्टनर लीड अरझान सिंगापूरवालिया यांसारखे आघाडीचे सीएक्स व ग्रोथ लीडर्स या सोहळ्याला उपस्थित होते.

नेटमेड्सचे चीफ कम्युनिकेशन्स ऑफिसर ब्रुस श्वाक यावेळी म्हणाले, “आम्ही गेल्या २ वर्षांपासून हॅप्टिक वापरत आहोत आणि अगदी सुरुवातीपासूनच आम्ही केवळ या उत्पादनांच्या तंत्रज्ञानामुळेच नव्हे, तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यवसायांना उद्दिष्टे प्राप्त करून देण्यात मदत करण्यावर कंपनी ज्या पद्धतीने लक्ष केंद्रित करत आहे, त्यामुळे प्रभावित आहोत. सीएस बाजूकडील संघर्ष कमी करण्यात व व्यवस्थापनात हॅप्टिक आम्हाला किती लाभ करून देऊ शकते याचा अनुभव आम्ही आधीपासून घेत आहोत आणि आता या नवीन व्हॉट्सअॅप कॉमर्स फीचर्समुळे तर ‘ब्राउजर्स’चे रूपांतर ग्राहकांमध्ये करण्यात आम्हाला मोठी मदत होणार आहे. आम्हाला सध्याचे ग्राहक टिकवून ठेवण्यात व नवीन ग्राहक प्राप्त करण्यात उपयुक्त ठरणाऱ्या कोणत्याही साधनाचे मी ‘स्वागतच’ करतो. त्यामुळे आता येथे थांबू नका, सर्वोत्तम अद्याप यायचे आहे.”


Back to top button
Don`t copy text!