घाडगेवाडीत संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिजाऊ जयंती साजरी


दैनिक स्थैर्य । दि. १२ जानेवारी २०२३ । बारामती । राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांची आज जयंती.. यानिमित्ताने घाडगेवाडी (ता.बारामती) येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेड बारामती तालुका अध्यक्ष तुषार तुपे, संभाजी ब्रिगेड उद्योजक कक्षाचे तालुका उपाध्यक्ष अजित चव्हाण, घाडगेवाडी शाखाध्यक्ष अभिजीत बळीप, उपाध्यक्ष कार्तिक काकडे, रणजित तुपे, रविंद्र भांडवलकर, सतीश तुपे, आबासो चव्हाण, शशिकांत फरतडे, लालासो तुपे, पोपटराव वळकुंदे, बाळासो बाबर, किरण साबळे, रोहन चव्हाण, महेंद्र भांडवलकर, ऋषिकेश मगर आदींच्या उपस्थिती मध्ये जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांनी जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.


Back to top button
Don`t copy text!