दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२२ । सातारा । येथील रयत शिक्षण संस्थेच्या जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूल वर्ये या शाळेचा सातारा आकाशवाणी केंद्र 103.1 वर ‘क कमाल ध धमाल’ हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमात प्राजक्ता तपसे हिचे प्रभावी निवेदन केले ,तू बुद्धि दे ही प्रार्थना, महिला दिनाचे भाषण,’राधे चल माझ्या गावाला जाऊ’ही गवळण,यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित भाषण, इत्यादी सादर कार्यक्रम झाले आई तुझ्या मूर्ति वाणी हे सुंदर गीत प्रतिक चव्हाण याने सादर केले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित नाटिका , "अरुणिमाचे आत्मकथन" विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे नियोजन उपशिक्षिका सौ.शुभांगी कुंभार यांनी केले. श्री. भोसले आर,.डी.सौ. पाटील यु.आर., सौ.कचरे आर.डी., श्री. पांब्रे ए.के .यांनी विशेष सहाय्य केले. तबला वादक श्री. संतोष शिंदे आणि हार्मोनियम वादक श्री. शशिकांत चोरगे यांनी कार्यक्रमाला साथसंगत दिली
त्यामुळे कार्यक्रम उठावदार झाला . मुख्याध्यापिका सौ .सुनीता सुभाष वाघमारे यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम प्रभावीपणे सादर करण्यात आला. यातील विद्यार्थ्यासह सावित्रीबाई फुले जयंती निमित्त जात्यावरील ओव्या, कथावाचन , कवितावाचन , स्वलिखित कविता वाचन घेण्यात आले होते .या हायस्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम शिक्षकांच्या उत्साही साथीने सुंदर व प्रभावीपणाने सादर केले जात असल्याने विद्यार्थ्यांस चांगले पर्यावरण मिळत आहे.