
स्थैर्य, निरगुडी, दि. १४ सप्टेंबर: ‘मरावे परी क्रांतीरुपे उरावे’ ही उक्ती सार्थ ठरवणाऱ्या, इंग्रजांना सलग १४ वर्षे सळो की पळो करून सोडणारे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती निरगुडी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
मिरवणुकीच्या प्रारंभी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी, भंडार्याची उधळण आणि ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.
या कार्यक्रमास माजी सरपंच जालिंदर सस्ते, माजी सरपंच राजेंद्र सस्ते, माजी सरपंच चंद्रकांत सस्ते, पत्रकार सुरज गोरे, युवा उद्योजक गणेश सस्ते, अमोल सस्ते, युवा नेते सचिन सस्ते, दिपक सस्ते, युवा नेते युवराज सस्ते, महावीर बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य दिपक मदने, ग्रामपंचायत सदस्य वामन जाधव, प्रदीप खुडे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय लकडे, महेंद्र गोरे, बाळासाहेब सोनवणे, सचिन खोमणे, अमित मदने, किरण लकडे, सामाजिक कार्यकर्ते निलेश गोरे, राजेंद्र खुडे, संदिप खवळे, प्रदिप मदने, संग्राम जाधव, आबाजी मदने, मल्हारी मदने, मल्हारी जाधव, पवन लकडे, बबलु मदने, ऋषी मदने, धीरज जाधव, पंकज मदने, शेखर चव्हाण, रोहित जाधव, आदर्श मदने, रोहिदास मदने, गणेश जाधव, अदि मदने, अविनाश मदने, करण मदने, सुरज जाधव, गौरव मदने, तानाजी जाधव, गुंडा मदने, विकास मदने, आप्पा मदने तसेच निरगुडी गावातील सर्व ग्रामस्थ आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

