जयकुमार शिंदे हेलिकॉप्टरने तातडीने मुंबईला रवाना..


दैनिक स्थैर्य | दि. २६ मार्च २०२४ | फलटण |
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अत्यंत महत्त्वाच्या बैठकीसाठी लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे व रोहित नागटिळे यांना हेलिकॉप्टरने मुंबईला पाठवले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोज नवीन नाट्यमय घडामोडी घडत आहेत. त्यासाठी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत अत्यंत महत्त्वाची बैठक होणार असून लोकसभा मतदारसंघातील काही घडामोडींवर चर्चा करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी मुंबईला बोलावलं आहे. या निवडणुकीच्या काळात जयकुमार शिंदे यांच्यावर पक्ष संघटनेने खूप महत्त्वाच्या जबाबदारी दिलेली आहे, असे यावरून दिसून येत आहे.

भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. गेली पाच वर्षे झाले जयकुमार शिंदे हे माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक निर्णयांमध्ये सहभागी असतात व संघटनेच्या बाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. संघटना व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याचं काम जयकुमार शिंदे करत असतात, त्याच पार्श्वभूमीवर ही महत्वपूर्ण बैठक प्रदेशाध्यक्षांनी ठेवली आहे.


Back to top button
Don`t copy text!