सातारच्या जान्हवी चा जगात डंका  सिद्धासन आसनमध्ये 5 तासाचा केला नवा विश्वविक्रम 


 

स्थैर्य, सातारा, दि.२४: लॉकडाऊनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना या कोरोना ची भीती न बाळगता सातारच्या कु.जान्हवी जयप्रकाश इंगळे ने एबीवायएम योगा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये 5 तास सिद्धासन हे आसन करून नवा विश्वविक्रम केला आहे. योगा मध्ये हे साताऱयातील पहिले वर्ल्ड रेकॉर्ड असल्याने जगात सातारच्या नावाचा डंका वाजत आहे. 

हॉटेल चालकांनी नियमांचे काटकोरपणे पालन करा : तानाजी बरडे

कु.जान्हवी जयप्रकाश इंगळे या योगा ट्रेनर असून 12 वर्ष योगा करत आहेत. गेल्या 5 वर्षापासून योगा शिकवत असून पतजंली सहयोग शिक्षक , लेवल 2 योगा ट्रेनर असून ,कोरोना काळात 21जून 2020 इंटरनँशल योगा डे रोजी फ्री योगा क्लास घेतला त्या बद्दल त्यांचा आयुष मंत्रालय भारतसरकार वायसीबी तर्फे योगा केअर हे सर्टिफिकेट देवून गौरव करण्यात आला.. त्यांचे शिक्षण बीए व डिप्लोमा कॉम्प्यूटर हार्डवेअर नेटवर्किंग इंजिनिअर झाले असून इँटरनॅशनल कंपनी सोबत बिझनेस करतात. जिल्ह्यात कोरोना दाखल झाल्यानंतर यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू झाले. या लॉकडाऊन मध्ये सर्वांनाच घरात राहणे बंधनकारक करण्यात आले. यामुळे सर्वाच्या मनावर काळजीचे भीतीचे सावट निर्माण झाले. कोरोनाचा कहर कमी होण्याचा विचार सगळेच करत होते. पण सातारची जान्हवी इंगळे ने आपल्या योगा मार्फत दररोज वाटचाल सूरू ठेवत फ्री योगा क्लास घेतले. लाँकडाऊन च्या आधी काँलेज च्या 350 मुलींना फ्री योगा ट्रेनिंग दिले आहे. आणि लाँकडाऊन काळात हि आँनलाईन योगा क्लास घेतले..काही तरी वेगळे करून कुटुंबाचे आणि सातारा जिल्ह्याचे देशात नाव उंचवावे हि भावना आधी पासूनच मनात होती आणि ..या दरम्यान, संधी चालून आली जान्हवी यांना सोशल मिडियावरून वर्ल्ड रेकॉर्ड विषयी माहिती मिळाली. त्यांनी या रेकॉर्ड मध्ये भाग घेतला. लॉकडाऊनमुळे हे रेकाँर्ड ऑनलाईन पार पडणार होते. यासाठी त्यांनी तयारी सुरू केली. ऑगस्ट महिन्यात त्यांनी आँडिशन दिले. या आँडिशन मध्ये त्यांची निवड झाल्यावर 13 सप्टेंबर रोजी ऑनलाईन रेकॉर्ड पार पडले. जान्हवी इंगळे यांनी सिद्धासन आसन चे सलग पाच तासाचे रेकॉर्ड केले. ऑनलाईन व्हिडिओ रेकाँर्ड झाले आणि कुरियर ने संपूर्ण आँफलाईन व्हिडिओ रेकाँर्डिग आणि माहिती पाठवण्यात आली. ती पाठवलेली माहिती व्हिडिओ हे सगळे वर्ल्ड रेकॉर्ड टिमने पाहून मान्य केले.आणि कुरियर ने गोल्ड मेडल सर्टिफिकेट प्राप्त झाले.. या रेकाँर्ड साठी वर्ल्ड रेकाँर्ड टिम कडून त्यांना याबद्दल गोल्ड मेडल सर्टिफिकेट योगा वर्ल्ड रेकाँर्ड होल्डर बँच टि शर्ट देण्यात आले.आतापर्यंत जान्हवी या अनेक मॅरथॉन रन मध्ये सहभागी झाल्या असून त्यांची ती आवड आहे. तसेच आयवायएसएफ स्वित्झर्लंड या योगा स्पर्धेतही सहभाग घेतला होता. एशिया योगा चॅपिंयनशिप अशा अनेक योगा स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला आहे.या रेकॉर्ड साठी एबीवायएम योगा बुकचे सिओ व फाऊंडर राकेश भारद्वाज,आई-वडील, बहिणी मित्र मैत्रीण,आदित्य मोरे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यवाह श्री.राजेश मोरे, डाँ .सौ.शुभांगी मोरे, शकिल शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हे रेकाँर्ड करण्यासाठी आई वडिल बहिणी यांनी प्रोत्साहन दिले..सातारचे माजी उपनगराध्यक्ष कै .जे.पी इंगळे आणि कै.शकुंतला इंगळे यांच्या त्या नात असून सातारा न.पा.शि.मंडळ सदस्य श्री.जयप्रकाश इंगळे यांच्या त्या कन्या आहेत… सिद्धासन हे आसन घेऊन या आसनामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड नोंद करून योगा मध्ये जागतिक नवा विक्रम करणार्या जान्हवी या सातार्यामधील पहिल्या युवती आहेत.

> १२ ज्योतिर्लिंग गाथा पारायण सोहोळा समितीच्यावतीने त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथील निवृत्तीनाथ मंदिर जिर्णोद्धारासाठी ११ लाख ११ हजार १११ रुपयांची भरीव देणगी


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!