
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.19 डिसेंबर 2022 । फलटण । श्रीराम सहकारी साखर कारखाना लि; फलटणचे सेवानिवृत्त कर्मचारी, श्रीराम विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि; फलटणचे माजी संचालक व जुन्या पिढीतील पतंगपटू जंगलराव गोविंदराव कापसे (आण्णा) यांचे आज, दि.19 डिसेंबर 2022 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक जगन्नाथ उर्फ भाऊसोा कापसे, अंकुश कापसे, संजय कापसे यांचे ते वडील होत.
फलटण मधील भैराबा गल्ली येथील त्यांच्या राहत्या घरापासून सायं.6:30 वाजता अंत्ययात्रा निघणार आहे.
