जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदी राहुल घाडगे, अजिंक्य खंडागळे यांची बिनविरोध निवड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जनता सहकारी बँक लिमिटेडच्या सेवक संचालकपदी राहुल कुंडलिक घाडगे आणि अजिंक्य मारूती खंडागळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ०८ ऑक्टोबर : सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी व सर्वसामान्यांची बँक असा नावलौकिक प्राप्त असलेल्या जनता सहकारी बँक लि., साताराच्या सेवक संचालकपदी राहुल कुंडलिक घाडगे व अजिंक्य मारूती खंडागळे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. जनता सहकारी बँक कर्मचारी संघाने दिलेल्या प्रस्तावास बँकेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

सत्कार व मार्गदर्शक मनोगत

नवनिर्वाचित सेवक संचालकांचा सत्कार बँकेचे चेअरमन अमोल मोहिते आणि ज्येष्ठ संचालक वसंत लेवे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बँकेचे पॅनेल प्रमुख तथा ज्येष्ठ संचालक विनोद कुलकर्णी, आनंदराव कणसे, अशोक मोने, चंद्रशेखर घोडके, अक्षय गवळी व मच्छिंद्र जगदाळे उपस्थित होते. विनोद कुलकर्णी यांनी घाडगे व खंडागळे यांच्या उत्तम कामकाजाबद्दल गौरवोदगार काढत कर्मचारी संघ व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली.

या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार यांच्यासह अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होता. नवनिर्वाचित संचालकांनी बँक व्यवस्थापन व कर्मचारी वर्गासोबत समन्वयाने काम करून बँकेच्या हिताचे निर्णय घेण्याची ग्वाही दिली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!