दैनिक स्थैर्य | दि. ८ सप्टेंबर २०२४ | फलटण |
भारताचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. गुरुवार दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून जैन सोशल ग्रुप फलटणतर्फे शिक्षक दिन श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, मारवाड पेठ, फलटण येथे साजरा करण्यात आला.
या दिवशी जैन समाजातील दहा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सौ. सोनल गांधी, नीता दोशी, सौ. वर्षा गांधी, सौ. अनिता दोशी, सौ. उत्कर्षा गांधी, सौ. मनीषा गांधी, श्री. निरंजन शहा, श्री. वितराग शहा, सौ. दिपाली शेट्टी, सौ. पद्मजा गांधी या शिक्षक-शिक्षिका यांचा सन्मानचिन्ह, मोत्यांची माळ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. मंगेश दोशी (गुणवरेकर), जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षा सौ. सविता दोशी, सचिव श्री. प्रीतम वडूजकर, खजिनदार श्री. समीर शहा, उपाध्यक्ष श्री. श्रीपाल जैन, माजी अध्यक्ष श्री. राजेंद्र कोठारी, संचालक डॉ.श्री. मिलिंद दोशी, श्री. हर्षद गांधी, श्री. तुषार शहा तसेच जैन सोशल ग्रुप सभासद व समाजातील श्रावक-श्राविका उपस्थित होत्या. जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षा सविता दोशी यांनी सत्कारमूर्ती शिक्षकांचे अभिनंदन करून शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
अतिशय उत्साहवर्धक वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला प्रास्ताविक सचिव प्रीतम शहा यांनी केले. सूत्रसंचालन श्रीपाल जैन यांनी केले. आभार प्रदर्शन संचालक डॉ. मिलिंद दोशी यांनी केले.