राज्यपालांच्या हस्ते जैन रत्न पुरस्कार प्रदान


दैनिक स्थैर्य । दि.३१ मार्च २०२२ । मुंबई । राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते नवनीत प्रकाशनचे बिपीन गाला, वसंत गलिया तसेच प्रदीप फोफानी यांना आज (दि. ३०) राजभवन येथे ‘जैन रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कोरोना संसर्गाच्या काळात मोफत व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजन सिलेंडर्स, मोफत आयसीयू बेड्स सुविधा, भोजन सुविधा व मास्क वाटप करून शेकडो लोकांचे प्राण वाचविल्याबद्दल गाला, गलिया व फोफानी यांना जैन रत्न पुरस्कार देण्यात आले.

श्री. बी.एन. मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला भूपेंद्र मेहता, वर्षा मेहता, अनिल गाला व इतर मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!