दैनिक स्थैर्य | दि. २९ डिसेंबर २०२३ | फलटण |
दिनांक २८ डिसेंबर रोजी पवारवाडीतून पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना माहिती मिळाली की, ऋषिकेश सुनील शेडगे हा नशेमध्ये गावातील लोकांना वेठीस धरून दुकानावर घरावर दगडफेक करून विनाकारण मारहाण करत आहे व त्याला नियंत्रित करणे कठीण झालेले आहे. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक रानगट, पोलीस हवालदार साबळे, पोलीस हवालदार चंगन व पोलीस नाईक अभंग यांना पवारवाडीत अंधार पडल्यावर पाठवले व सदर इसमाला ताब्यात घेतले.
सदर इसमाची नशा उतरवण्यास सकाळ झाली होती. नशा उतरल्यानंतर त्याला त्याने काय केले, याची जाणीव नव्हती तरी पोलिसांनी १६९९/२३ कलम ४५२ ३२३ ५०४ ५०६ भादविसह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११० प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याच्या कृत्याची सजा देऊन त्याला सकाळी न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्याला मंगळवार पर्यंत न्यायालयीन कोठडी दिलेली आहे. यापुढे नशेबाज लोकांना कोठडीची हवा देणार आहेत. विनाकारण लोकांना विठ्ठल धरणार्यांविरुद्ध कठोर कारवाई होईल. पोलिसांच्या या कारवाईने आसू, पवारवाडी समाधान व्यक्त होत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल व उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.