
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २९ डिसेंबर २०२३ | फलटण |
पवारवाडी येथे विनाकारण घरात घुसून मारहाण व शिवीगाळ केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुरेश नामदेव पवार (वय ६५, राहणार एसटी स्टँड समोर, पवारवाडी, ता. फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
या मारहाण प्रकरणी ऋषिकेश सुनील शेडगे (राहणार पवारवाडी, तालुका फलटण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी, दि. २८ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पवारवाडी गावचे हद्दीत शंकर सकुंडे यांच्या गॅरेजच्या बाजूला असलेल्या रोडवर व फिर्यादी यांचे घरी ऋषिकेश सुनील शेडगे हा घुसून त्याने शंकर सकुंडे यांना व माणिकराव पवार यांना मारहाण व शिवीगाळ केल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेचा अधिक तपास पो. ना. अभंग करत आहेत.
