स्थैर्य, फलटण, दि. २३ : काळानुसार शेती करण्याच्या पद्धतीमध्ये अनेक बदल होत आहेत. तरी आगामी काळामध्ये शेतीमध्ये होणारे बदल लक्षात घेऊन निंबळक व परिसरामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम जे. के. ॲग्रोच्या माध्यमातून करण्यात यावे, असे आवाहन उदयसिंह निंबाळकर यांनी केले आहे.
निंबळक ता. फलटण येथील जे. के. ॲग्रो या शेती पूरक, बी बियाणे औषधे, मिश्र खते या दुकानाचा शुभारंभाच्या दरम्यान उदयसिंह निंबाळकर बोलत होते.
यावेळी अमर निंबाळकर, पंचायत समिती सदस्य संजय कापसे, राजाभाऊ निकम, राहुल इवरे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष जयराम मोरे, काशिराम मोरे व मोरे कुटुंबियांनी उपस्थित शेतकरी वर्गाचे स्वागत केले व आभार मानले.